प्रस्तावना :
...'गिरनार यात्रेला जाणे' ही प्रत्येक दत्तभक्ताच्या मनातील सुप्त इच्छा असते. आणि असणारच ना ? प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी १२,००० वर्षे तपश्चर्या केलेली पवित्र जागा. तिकडच्या एक पुजाऱ्याच्या शब्दात सांगायचे तर 'this is the place of the king of kings!'. आणि आहेच ते स्थान तसे ! साक्षात दत्तात्रेय व शिष्य गोरक्षनाथ यांचे वास्तव्य अजूनही तेथे आहे असे सांगितले जाते. दत्तात्रेयांच्या पवित्र अधिष्ठानामुळे गिरनार गुरुशिखराच्या ४० कि.मी. परिघात सर्व देवी-देवता वास्तव्य करतात असे तेथील पुजारी सांगतात.
अशा दुर्गम तरीही अतिशय सुंदर स्थानी जाण्याचा योग आला ही सद्गुरू कृपाच! 'तोच घेऊन गेला' असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या यात्रेचे यथासांग वर्णन खालील लेखात करण्याचा प्रयास करेन.
'अनिरुद्ध एव बुद्धिदाता ।'
यात्रा शुभारंभ (गुरुवार ०२/०६/२०१६)... प्रथम सोमनाथ दर्शन:
गुरुवारी दत्तबाप्पाकडे निघायचे असल्याने आनंद द्विगुणित झाला होता. बांद्रा टर्मिनसहून दुपारी १३:३० वाजता निघणाऱ्या सूर्यनगरी सुपरफास्टने निघालो. नवीनच Group असल्याने आधी कोणी एकमेकांशी फारशे बोलत नव्हते. छोट्या छोट्या Groups मध्ये गप्पा-गोष्टी सुरू झाल्या. संध्याकाळी आरती-गजर घ्यायला सगळे ट्रेनमध्येच एकत्र आले आणि मग धम्माल सुरू झाली. कोण आरती , कोण गाणे तर कोणी मध्येच jokes मारून एकमेकांना हसवत होते. रात्री ९ वाजता गुजरातमधील अहमदाबादला उतरलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:०० वाजताच वेरावळला पोहोचलो. तेथून सोमनाथ ७-८ कि.मी. आहे. टमटमने २०-२५ मिनिटे लागतात. तिकडे अनेक धर्मशाळा आहेत, ज्या माफक दरात राहण्याची व्यवस्था पुरवतात.
इकडे आवर्जून सांगावेसे वाटते की तिकडचे पाणी हे बोरिंगचे असल्याने अतिशय क्षारयुक्त असते. त्यामुळे केस खूप चिकट होतात.
आंघोळ करून तयार होऊन 'सोमनाथ मंदिर'ला दर्शनाला निघालो. सोमनाथ मंदिरात half pant घालून येण्यास परवानगी नाही, याची भक्तांनी नोंद घ्यावी. गुजरातमधील 'सोरटी-सोमनाथ मंदिर' हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने अतिशय वर्दळीचे असते. हे मंदिर नेमके कधी बांधले गेले याची नेमकी नोंद सापडत नाही पण इ.स. ६४९ मध्ये याची पुनर्बांधणी यादव राजांनी केली असे सांगितले जाते. इतिहासात या मंदिरावर अनेक आक्रमणे झाल्याचा उल्लेख आहे. याचे कारण म्हणजे त्या काळात हे भव्य मंदिर पूर्ण सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. यामुळेच १०२४ ला अफगाण राजा मोहम्मद गझनी पासून अगदी सोळाव्या शतकातील औरंगजेबाने या मंदिराची अनेक वेळा नुकसान करण्यात आले. तरीही पुन्हा पुन्हा हिंदू राजांकडून हे पवित्र मंदिर पुन्हा पुन्हा बांधले जायचे.
" बांधणाऱ्याची ताकद ही नष्ट करणाऱ्याच्या ताकदीपेक्षा नेहमीच मोठी असते"
या उक्तीचा 'सोरटी-सोमनाथ मंदिर' हा जिवंत नमुना आहे. आता आपण पाहत असलेले भव्य मंदिर १९५१ साली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने बांधले गेलेले आहे.
(छायाचित्र : सोमनाथ मंदिर, source internet)
मंदिरात जातानाच आमचा 'शिवपंचाक्षर मंत्रा'चा जप सुरू झाला. चालुक्य शैलीत बांधलेल्या मंदिराची भव्यता आणि सौंदर्य न्याहाळता न्याहाळता आपण हळू हळू मंदिर प्रांगणातून आत प्रवेश करतो. तांबड्या कोरीव दगडात बांधलेले त्या मंदिराच्या खांब/भिंती/छतावरील नक्षी पाहून मन हरपून जाते. 'कधीकाळी सोन्याच्या पत्र्यामुळे चकाकणारे हे मंदिर कसे दिसत असेल! ' हा विचार मनात येतोच. भव्यता आणि नाजूकता यांचा अप्रतिम संगम या मंदिराच्या बांधकामात ओतप्रोत भरलेला दिसतो.
मुखात 'शिवपंचाक्षर मंत्रा'चा जप करताच गाभाऱ्यात प्रवेश करताच समोरचे भव्य शिवलिंग पाहताच हात आपोआप जोडले जातात. गाभाऱ्यातील नंदीचे दर्शन घेऊन आपण शिवलिंगाच्या जवळ येतो आणि मनसोक्त दर्शन घेऊन तृप्त होतो. ...आणि हो, सांगण्यासारखे असे की गाभाऱ्यातील सजावट आजही सोन्याच्या पत्र्याची आहे.
(छायाचित्र : सोमनाथ मंदिर गाभारा , source internet)
सध्याच्या मुख्य मंदिराच्या बाजूला जुन्या मंदिराचा चौथरा दिसतो. मंदिराच्या आवरातच एक दालन आहे, ज्यात पुराणांमधील काही निवडक गोष्टी आहेत. मंदिर आवारात photographyला सक्त मनाई असल्याने अनेक स्थानांचे photos internetवरुन घेतलेले आहेत.
(छायाचित्र : सोमनाथ मंदिर रात्रीचे दृश्य , source internet)
बाणस्तंभ: मंदिर आवारात हमखास लक्ष वेधून घेते अशी वास्तु म्हणजे 'बाणस्तंभ'! या स्तंभावर एक संस्कृत श्लोक लिहिले ज्याचा अर्थ असा की "या स्तंभावरील बाण दक्षिण ध्रुवाची दिशा दर्शवितो आणि या स्तंभापासून दक्षिण ध्रुवापर्यन्त सरळ रेषेत जलमार्गाने जाताना वाटेत एकही भूखंड नाही." मित्रांनो, शेकडो वर्षांपूर्वी हे लिहीणाऱ्या भारतीयांचे नौकानयन आणि भूगोलशास्त्र किती प्रगत होते, याचा विचार करून आपण दि:मूढ होतो.
(छायाचित्र : सोमनाथ मंदिर प्रांगणातील बाणस्तंभ, source internet)
जवळच अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेले पुरातन शिव मंदिर आहे. या मंदिराचा बराचसा मोठा भाग भूपातळीपेक्षा खाली आहे(तळघरासारखा). असे म्हणतात, एका आक्रमणापासून वाचविण्यासाठी मुख्य सोमनाथ मंदिरातील देवता याच मंदिरात लपवून ठेवलेल्या. (तथापि, लिखित संदर्भ फारशे उपलब्ध नसल्यामुळे या गोष्टींची पुष्टी करता येत नाही.)
मंदिरापासून जवळच बाणगंगा म्हणून तीर्थ आहे, जिथे भर समुद्रात ३ शिवलिंग स्थापन केलेली दिसून येतात.
(छायाचित्र : सोमनाथ मंदिराजवळील बाणगंगा तीर्थ)
तेथून पुढे आम्ही भालका तीर्थला गेलो.पाय सोडून बसलेल्या श्रीकृष्णाला व्याधरूपी वालीने हरिणाचे अंग समजून बाण मारला. तो बाण शरीरात स्वीकारून श्रीकृष्णाने अवतारसमाप्ती केली, तीच ही पवित्र जागा. या प्रसंगानंतर द्वापारयुग संपून कलियुगाचा आरंभ होतो ही कथा आपण 'मातृवात्सल्य विन्दानम' ग्रंथात वाचतो. आम्ही गेलो तेव्हा तेथे नवीन मंदिराचे बांधकाम चालू होते.
(छायाचित्र : भालका तीर्थ मंदिरातील पाय सोडून बसलेला श्रीकृष्ण )
पुढे एका ढाबा type हॉटेलात मस्त 'गुजराती थाळी'चा lunch केला. ४-५ प्रकारच्या भाज्या, रोटी-रोटला, गुजराती कधी आणि विशेष म्हणजे पाण्या ऐवजी ताक! जेवणाचा सोहळा जबरजस्त झाला.
पुढे आम्ही सोमनाथ railway station वरून जुनागढला निघालो...गिरनारसाठी!
!!जय गिरनारी !!

रात्रीचे जेवण अहमदाबाद railway station जवळील Sunrise veg. restaurant (contact# 079 2214 5601) येथून parcel मागवले. लगेच, २२:०० ची वेरावळ जाणारी 'सोमनाथ एक्सप्रेस' पकडली. रात्रीच्या थोड्या गप्पांनंतर सगळे झोपी गेले.

खुप सुंदर लिहिला आहेस मित्रा फक्त सोमनाथ मंदिरात half pant घालून येण्यास परवानगी नाही हे update कर अंबज्ञ
उत्तर द्याहटवाअंबज्ञ महेशसिंह, तू दिलेली सूचना लेखात समाविष्ट केली आहे.
हटवाThis blog is very informative
उत्तर द्याहटवाMohan khup sunder....Ambadnya
उत्तर द्याहटवाAmbadnya for information...khup chan...
उत्तर द्याहटवाखूपच छान भावा
उत्तर द्याहटवागिरनार जाण्याआधी भरपुर माहीती मिळाली
|| अंंबज्ञ ||
खूपच छान भावा
उत्तर द्याहटवागिरनार ची भरपूर माहीती मिळाली
|| अंबज्ञ ||