प्रस्तावना :
काल रात्री ( मंगळवार दि. ०८/११/२०१६ )अख्ख्या जगाचे लक्ष अमेरिकेच्या निवडणुकीकडे लागलेले असताना माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी एक ऐतिहासिक दमदार पाऊल उचलले! भारतातील काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी ५००/- आणि १०००/- रुपयाच्या जुन्या नोटांना तडकाफडकी अवैध ठरवले. 'आमच्याकडें असलेल्या जुन्या नोटांचे काय?' या प्रश्नाने सामान्य नागरिक भांबावले. त्यातच दोन दिवस ATM बंद राहणार असल्याने सर्व बँकांच्या ATM समोर लांबच लांब रांगा लागल्या. एकूणच, भरपूर वेळ अनेकांना या निर्णयाचा अर्थ न समजल्याने गोंधळाचे वातावरण होते.
... पण नंतर घरी गेलो आणि सर्वप्रथम इंटरनेट open केले. मा. पंतप्रधानांचे ३७ मिनिटांचे देशाला संबोधून केलेलं भाषण ऐकले. ते भाषण ऐकताना अंगावर रोमांच उभे राहत होते. या निर्णयाचा दूरगामी परिणामांचा विचार करताना मनात पंतप्रधांनांविषयी आदर मिनिटा मिनिटाला वाढत होता. इतका कणखर निर्णय घेणाऱ्या सरकारची किती प्रशंसा करू आणि किती नको असे झाले होते!
या बरोबरच पूर्ण माहिती नसताना , गोष्टी समजून न घेता सवयीप्रमाणे 'सरकार'ला शिव्या घालणाऱ्या 'सुजाण' नागरिकांच्या बुद्धीची कीव येत होती. त्यामधल्या ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांना ' पंतप्रधानांचे पूर्ण भाषण ऐका' हे आवर्जून सांगत होतो. 'कोणी आता ५००/-/ १०००/- च्या जुन्या नोटा दिल्या तर घेऊ नका' हे सांगत होतो. तरीही , समाधान होत नव्हते! तेव्हा या निर्णयाबद्दल भरभरून येणारे विचार लिहायला बसलो. सर्वप्रथम आपण समजून घेऊ की मा. पंतप्रधानांनी नेमकी काय घोषणा केली. संपूर्ण भाषणाची Internet लिंक खाली जोडत आहे. अगदी आजच नको ,पण वेळ काढून जरूर बघा.
(Internet लिंक : PM Modi's address to the nation : https://youtu.be/zmwQWe-jA_4 , वेळ: १ तास २ मिनिटे )
मंगळवार दि. ०८/११/२०१६ च्या भाषणातील घोषणा (थोडक्यात) :
* मंगळवार दि. ०८/११/२०१६ रात्री १२ वाजल्यापासून जुन्या ५००/- आणि १०००/- रुपयाच्या नोटा अवैध ठरतील.
* सामान्य नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या कडे असलेल्या जुन्या नोटा दि. ३०/१२/२०१६ पर्यंत (५० दिवसात) स्वतःच्या बँका आणि पोस्ट ऑफिस मधील खात्यात जमा करता येतील .
* दिवसाला जास्तीत जास्त ४०००/- रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील.
* या काळात आपण स्वतःच्या गरजेसाठी बँकेतून दिवसाला १०,०००/- तर आठवड्याला २०,०००/- रुपये काढू शकतो.
* काही कारणास्तव दि. ३०/१२/२०१६ पर्यंत जुन्या नोटा जमा करणे शक्य न झाल्यास दि. ३०/०३/२०१७ (अधिक ३ महिने) पर्यंत रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत केंद्रात तुमच्याकडच्या जुन्या नोटा जमा करण्याची सुविधा उपलब्ध होईल.
* याला अपवाद म्हणून ज्यांचे नातेवाईक रुग्णालयात आहेत, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शासकीय रुग्णालये आणि शासकीय औषधाच्या दुकानांमध्ये फक्त गोळ्या-औषधे विकत घेण्यासाठी जुन्या नोटा आणखी ३ दिवस म्हणजे दि. ११/११/२०१६ पर्यंत वैध असतील.
* ५००/- आणि १०००/- रुपयाच्या जुन्या नोटांव्यतिरिक्त इतर सर्व १००/- ५०/- १०/- ५/- १/- च्या नोटा आणि सर्व नाणी यांचे चलन पूर्वीप्रमाणेच चालू राहील.
* आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सर्व काळात cheque / नेटबँकिंग/ online वित्त व्यवहार नेहमीप्रमाणे चालू राहतील. सामान्य नागरिकांना या सुविधा नेहमीप्रमाणेच वापरता येतील.
...एकूणच सामान्य प्रामाणिक नागरिकाला या इतक्या मोठ्या निर्णयाचा काहीच त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.
या निर्णयाचे दूरगामी परिणाम :
आता आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे की ५००/- आणि १०००/- च्या नोटांवर बंदी आणल्याने काळा पैसे नष्ट होणार कसा ?
... मित्रांनो, काळा पैसा- बनावट नोटा - दहशदवाद - महागाई - जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर या सर्वांचा आपापसात खूप जवळचा संबंध आहे. एका सामान्य भारतीय नागरिकांकडे घरात आणि बँक लॉकर मध्ये वगैरे स्वतःला आवश्यक त्यापेक्षा थोडेसे जास्त पैसे असतात, त्यात काहीही गैर नाही! पण, अनैतिक मार्गाने पैसे कमावणारे आणि साठवणाऱ्यांकडे अशा प्रकारे खूप जास्त रक्कम लपवून ठेवलेली असते! ५००/- आणि १०००/- या नोटांची value जास्त असल्याने, जास्तीत जास्त काळे धन या नोटांच्या स्वरूपात साठविले जाते. ...आता साहजिकच ना ! मला जर चोरीचे १ लाख रुपये लपवून ठेवायचे आहेत तर १०/-, २०/- रुपयाच्या हजारो नोटा लपवेन की १०००/- च्या १०० नोटांचा बंडल लपवीन ? ...उत्तर तुम्हाला माहितेय!
याच प्रकारे काही 'महाभागांनी' अशी अरबो रुपयांची गंगाजळी लपवून ठेवलेली आहे! काल रात्री नंतर या सर्व धनाची किंमत शून्य झाली आहे. बँका आणि पोस्ट ऑफिस मधील खात्यात जमा करता येण्या जोग्या रकमेवर कमाल मर्यादा लावून माननीय पंतप्रधानांनी त्यांचे काळे धन पांढरे करता येणार नाही याची काळजी घेतली!
मा. पंतप्रधांनी केलेली वेळेची अचूक निवड :
कोणताही मोठा निर्णय अचूक होण्यासाठी तो 'उचित वेळेची निवड' खूप महत्त्वाची ठरते. त्या अनुषंगाने कालच्या दिवसाची आणि तीही संध्याकाळीच घोषणा का करण्यात आली याचे महत्त्व जाणून घेऊया...
* दिवाळीचा मोठा सण नुकताच होऊन गेला. त्यामुळे तुमच्या आमच्याकडचे अधिक ते पैसे आपण खर्च केलेले आहेत. त्यामुळे घरी मोठ्या किमतीच्या नोटा फार कमी राहिल्यात. आणि ज्या थोड्या उरल्यात त्या आपण सोयीस्कररित्या स्वतःच्या खात्यात जमा करू शकतो.
* काळे धन स्वतःहून घोषित करायची शेवटची तारीख (दि. ३०/०९/२०१६) महिन्याभरापूर्वी मागे पडली. 'आमचे काळे धन वाचले' अशा खुशीत गाजरे खाणाऱ्यांना सणसणीत चपराक बसली. त्याइतकेच महत्त्वाचे म्हणजे, चुकीला माफी नाही हि शिकावं देऊन सामान्य नागरिकाचा system वरचा विश्वास वाढवला.
* जगाचे (विशेषतः या महाठगाचें) लक्ष अमेरिकेच्या निवडणुकीकडे लागले असल्या कारणाने असा कोणताही निर्णय त्यांना अनपेक्षित होता. त्यामुळेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या Surgical strike पेक्षा हा master stroke लक्षगुणे पॉवरफुल आहे.

* ही बातमी संध्याकाळी ७ नंतर बाहेर आली आणि १२ वाजता नोटा अवैध झाल्या . त्यामुळे 'ठगांना' काहीही करण्याची संधी फारशी मिळाली नाही.
* सर्वात महत्वाचे म्हणजे दुसऱ्या दिवशी उठून कामावर जाणारा सामान्य नागरिक रात्रभरात 'सावध' झाल्यामुळे कोणत्याही फसवणुकीला बळी पडणार नव्हता.
... एकूणच, अतिशय well -planned आणि well -timed खेळी खास मोदी-शैलीत खेळली गेली.
पुढच्या काही दिवसात सामान्य नागरिकांनी घ्यायची काळजी :
* घाबरू नका!
* ' आपले पैसे वाया गेले' / 'ATM मधले पैसे संपले' अशा अफवांना बळी पडू नये. सामान्य नागरिकाला त्रास होईल असा कोणताही निर्णय सरकार घेणारच नाही हा ठाम विश्वास या आणि पुढच्या काळात आपण ठेवुया.
* ' मी तुला ५००/- देतो, मला फक्त ४००/- दे' अशी मस्करी आमच्या ट्रेनच्या डब्यात चालली होती. पण अशा गोष्टी मोठ्या प्रमाणावर व्हायची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावध राहावे! , त्यांच्या पापात आपल्याला सहभागी करायचा हा प्रयत्न आहे, हे ओळखून आपण अशा प्रलोभनांना बळी पडू नये.
* कुठेही नोटांनी भरलेली बॅग/ पिशवी दिसल्यास ती उचलायचा मोह नको! त्यात बॉम्ब सारख्या गोष्टी ठेवल्या जाऊ शकतात.
* एकूणच, ' मेहनतीने आपण लाखो-करोडो कमावू, पण चुकीच्या मार्गाने येणारा एक रुपयाही नको' ही भारतीय घराघरात दिली जाणारी नैतिकतेची शिकवण प्रत्यक्षात आणण्याचा हा काळ आहे.
...शेवटी लक्षात ठेवा की काळ्या धनाविरुद्ध लढाई आपली प्रत्येकाची आहे. तर चला मग या शुद्धीकरणाच्या महायज्ञात आपणही आपला खारीचा वाटा उचलुया.
पुढच्या काळात असे अनेक निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यावेळी कोणत्याही अफवांनी विचलित न होता एका सुजाण आणि जबाबदार नागरिकांची भूमिका आपण सर्वच निभावूया. तसेच, हे देशद्रोही/नतद्रष्ट/वाईट लोक कोणत्याही जात/धर्म/देशाचे नसतात. हे गप्प बसणार नाहीत! ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे आपल्या सरकार आणि देशाच्या विकास व संरक्षणासाठी आपापल्या देवांना 'देव मदत करेलच!' या विश्वासाने प्रार्थना करूया. शेवटी म्हणतात ना ...' मारणाऱ्यापेक्षा वाचवणाऱ्याची ताकद जास्त असते'. आई जगदंबेच्या कृपेने माझ्या महान देशात लवकरच रामराज्य येवो!
युद्धकर्ता श्रीराम: मम् । समर्थ: दत्तगुरु: मूलाधार: ।
साचार: वानरसैनिक: अहं । रावणवध: निश्चित: ।।... इति अनिरुद्ध महावाक्यम ...