सोमवार, २३ मे, २०१६

श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रं, निंबगाव,(Shree Aniruddha Punyakshetram,nimbgaon),अंमळनेर, धुळे …प्रथम भेट - मार्च २५, २०१६

हरि ओम - श्रीराम - अंबज्ञ ,

प्रस्तावना  : 

… वर्धमान व्रताधिराजाचे पवित्र उगमस्थान , आपले लाडके पणजोबा ( सद्गुरु अनिरुद्ध बापूंचे मानवी सद्गुरु) श्री गोपीनाथशास्त्री पाध्ये यांच्या उपासनेने पावन झालेली तपोभूमी आणि आपल्या संस्थेचे एक तीर्थक्षेत्र  इतकीच काय ती श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रंची माहिती होती आम्हाला ! आपल्या लाडक्या dad ने या स्थानाची माहिती सांगितल्यापासून 'श्री अनिरुद्ध पुण्यक्षेत्रं, नीमगाव' काय असेल, याची उत्सुकता लागून होती. पण न जाणो का, जायचा योगच येत नव्हता!

यावेळी ' कोल्हापूर medical कॅम्प - २०१६' वरून परतताना आमच्याबरोबर बसमध्ये नीमगावचे २ कार्यकर्ते होते. त्यांच्याबरोबर अनुभवसंकीर्तन करताना श्री अनिरुद्ध पुण्यक्षेत्रंबद्दल माहित नसलेल्या अनेक गोष्टी नव्याने कळल्या.…आणि मग काय पुण्यक्षेत्रंला जायचे बसमध्येच ठरले!

 -----(पुण्यक्षेत्रं भेट : गुरूवार मार्च २४  , २०१६ या सुचितदादा-समिरदादांच्या वाढदिवशी )--------

पुण्यक्षेत्रंवरून परतल्यावर इतर बापूभक्तांशी बोलताना असे जाणवले की या पवित्र स्थानाची २००५ साली स्थापना झालेली असूनही लोकांना याबद्दल फारच थोडकी माहिती आहे. म्हणून तेथून परतल्यानंतर त्या स्थानाबद्दल माहिती गोळा केली (संदर्भ जागोजागी दिले आहेत).

… हा माहितीचा गोडगोड ठेवा सर्वांना मिळावा हीच सदिच्छा! अंबज्ञ !

(तुमच्याकडे अधिक माहिती असल्यास  / दिलेल्या माहितीत काही त्रुटी आढळल्यास खाली comment section मध्ये कळवावे हि सविनय प्रार्थना)

श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रं स्थापना माहिती : 

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरपासून २७ कि.मी. अंतरावरील नीमगाव येथे तापी आणि पांझरा या नद्यांच्या पवित्र संगमावर श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रंची स्थापना dad करणार याची माहिती सर्वप्रथम मार्च १७, २००५ साली प्रवचनापूर्वी देण्यात आली.

(संदर्भ : स्टार वृत्त श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रं विशेषांक, मार्च ३१, २००५; या लेखाला जोडलेला आहे. स्पष्ट दिसत नसल्यास download करून zoom करून वाचावा )



याच प्रवचनात बापूराया म्हणालेला कि " या ठिकाणी आपण पहिल्यांदा उभारणार आहोत दोन गोष्टी; पहिले म्हणजे अत्यंत सुरेख आणि अत्यंत सुंदर असे मंदिर. त्या मंदिरामध्ये काय असणार आहे? दत्तगुरुंची मूर्ती मध्ये उभी आहे. त्यांच्या उजव्या बाजूला श्रीपाद श्रीवल्लभ तर डाव्या बाजूला स्वामी नृसिंह सरस्वती अशा तीन मुर्ती. त्याच ठिकाणी माझे मानवी सद्गुरु गोपीनाथ शास्त्रींच्या अस्थि, ज्या माझ्या आजीने आणि आईने सांभाळून ठेवल्या आहेत; त्यांची स्थापना करून समाधी बांधण्यात येणार आहे. दत्तगुरूंच्या त्रिमूर्ती आणि गोपीनाथ शास्त्रींची समाधी अशा माझ्या भावनांशी निगडीत, माझ्या आदराची, माझ्या प्रेमाची, माझ्या वात्सल्याची स्थाने स्थापन करतोय पुण्यक्षेत्र म्हणून! (या दोन्ही वास्तूंची अद्याप स्थापना dad ने केलेली नाही याची भक्तांनी नोंद घ्यावी) ते सद्गुरु क्षेत्र असेल की , जिथे प्रवेश करणे म्हणजे साक्षात देव लोकात प्रवेश करण्यासारखे आहे!…. अंमळनेरपासून थोड्या अंतरावर असणारे हे लहानसे गाव कधी जगाच्या नकाशावर जाउन पोहोचेल हे आम्हाला कळणार नाही,  इतकी या जागेची ताकद आहे " .


(छायाचित्र : श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रं जागा येथून सुरु होते)

लेकरांसाठी बापूरायाचे प्रयास: 

१ एप्रिल २००५ च्या ऐन उन्हाळ्यात dad अंमळनेर आला.….आला तोच नीमगावला निघाला. आज त्याला पणजोबांनी उपासना केली 'ती' टेकडी आणि 'ती' शिळा शोधायची होती! ज्या रणरणत्या उन्हात heat -strokeच्या भीतीने गावातले कष्टकरीही फिरायचे टाळतात , तिथे हा बाप आमच्यासाठी 'ती' टेकडी शोधत होता.  हो…छत्री धरायला volunteer होता, पण शोधाच्या ध्यासाने लांब पावले टाकणाऱ्या dad च्या मागे धावताना त्या volunteer ची दमछाक होत होती .…अणि सापडली 'ती' टेकडी ! … अर्धे mission  successful  ! पांझरानदी कांठी 'ती' टेकडी आजही बापूने 'जशीच्या तशी' ठेवली आहे. तेव्हा होती तशी …पुढच्या लाखो वर्षांसाठी !

… आता तसाच नदीच्या उन्हात तापलेल्या पात्रातून  'हा' निघाला …'ती' शिळा शोधण्यासाठी! सोबत असलेल्या मोजक्या volunteer ना एव्हाना घामाची आंघोळ झाली होती. बापूराया म्हणाला" आपल्याला आता एक शिळा शोधायाचेय". तापी नदीच्या पात्रात अशा अनेक शिळा होत्या . प्रत्येक शिळेकडे बोट करून volunteer  दाखवत होते …पण नाही! 'ती' शिळा काही सापडली नाही! दिवस मावळला, dad  मागे फिरला, अमळनेरला.

दुसऱ्या दिवशी पुन्हा शोध मोहीम चालू! …पण आज 'ती' शिळा सापडली. जय जगदंब जय दुर्गे! बापुरायाच्या आनंदाला पारावर उरला नाही. खरंच, तापी नदीच्या त्या विशाल पात्रात अशा अगणित शिळा आहेत त्यांतून dad ने नेमकी 'ती' शिळा कशी शोधून काढली, त्याला माहित!

पुढे सद्गुरु पुण्यक्षेत्रंमध्ये मूळ  जागेची originality  तशीच ठेवून अनेक सुधारणा करण्यात आल्या. आज त्या जागेत Dormitory, kitchen, शेती, compound, उपासना कुटीर बांधली आहेत.  तरीही , तेथे एक साधीशी shed बांधायलासुद्धा समीरदादा/सुचितदादा यांची परवानगी घ्यावी लागते , हे सांगायला तेथील local volunteers विसरत नाहीत. आपल्या लेकरांना ती जागा 'जशीच्या तशी' पाहायला मिळावी हा dad चा त्यामागचा आग्रह! त्यामुळे तिथे येणारा कधीच 'उशिरा' येत नाही. अशा या काळाच्या पलीकडे असलेल्या पवित्र स्थानाची अधिक माहिती आणि काही सुंदर stories ऐकायला तुम्ही जेवढे उत्सुक आहात त्यापेक्षा त्या अवीट गोड गोष्टी सांगायला मी उताविळा आहे.



(छायाचित्र :श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रंमधील Dormitory)


(छायाचित्र : श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रं परिसर. या विभागात असणारी कडूनिंबाची झाडे यागावाचे 'नीम' हे नाव सार्थ करतात)

।। हरि ओम - श्रीराम - अंबज्ञ ।। 

१२ टिप्पण्या:

  1. फार छान सांगितले । अंबदन्य

    उत्तर द्याहटवा
  2. Hari om shreeram Ambadnya. Feeling blessed to know about Shreepunyakshetram. Very much Appreciated. Ambadnya.

    उत्तर द्याहटवा
  3. प.पू.बापूंच्या कृपेने श्रीपुण्यक्षेत्रमला जाण्याचा हा दुसरा योग आला आहे. गतवर्षी वर्धमान व्रताधिराज सांगतेला गेलो होतो. अत्यंत पवित्र,शांत देवलोक स्थान आहे. अंबज्ञ.

    उत्तर द्याहटवा
  4. Hari om bapuraya mast mahiti samjli ambadny Hari om

    उत्तर द्याहटवा
  5. हो खुप इच्छा होती पण योग या वर्षी आला आहे. जाणार आहे बापू घेऊन जाईल.

    उत्तर द्याहटवा
  6. अंबज्ञ..., मोहनसिंह श्री सद्गुरू पुण्यक्षेत्रम् बद्दल खुपच सुंदर माहिती तुम्ही आम्हाला दिलात. पुन्हा एकदा श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्...

    उत्तर द्याहटवा
  7. अंबज्ञ..., मोहनसिंह श्री सद्गुरू पुण्यक्षेत्रम् बद्दल खुपच सुंदर माहिती तुम्ही आम्हाला दिलात. पुन्हा एकदा श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्...

    उत्तर द्याहटवा